महाराष्ट्र मुंबई

“काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्या”

मुंबई | लॉकडऊनमुळे अनेक दिवसांपासून वाईन शॉप आणि बार बंद आहेत. निदान दररोज ठराविक वेळासाठी का होईना वाईन शॉप उघडण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. मात्र एकूणच परिस्थिती लक्षात घेता सध्या तसं करणं शक्य नसल्याचं राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मद्याची दुकानं पूर्णवेळ उघडी ठेवू द्या अशी आमची मागणी नाही पण समजा तीन ते चार तास जरी दुकाने उघडी ठेवायची परवानगी मिळाली तरी फायदा होईल, असं महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनचे चेअरमन दिलीप गियानानी यांनी म्हटलं आहे.

अनेक मद्यपींना आता विड्रॉल सिम्पटमचा त्रास होऊ लागलेला आहे. तर दुसरीकडे काळया बाजारात मद्याची विक्री होत आहे. या सगळ्याचा परिणाम सरकारच्या महसुलावर होतो आणि सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण होतात, असं गियानानी यांनी नमूद केलं आहे.

आम्ही याबाबत राज्य उत्पादन शुल्क खात्याशी या विषयावर अनौपचारिकरीत्या संवाद साधला आहे आणि त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असं गियानानी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन

लॉकडाऊन काही भागात शिथील करता येईल का?, पवारांची मोदींना विचारणा

महत्वाच्या बातम्या-

‘बाहेरचा आला नी धमकावून गेला’; ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री संतापली

पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या