बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या’; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

मुंबई | राज्य सरकारने लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

राज्यातील लॉकडाऊन हा शिथील करण्यात येत आहे. मॉल्स, हॉटेल्स सुरु करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयातही कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थितीत अनिर्वाय करण्यात आली आहे. तसेच खासगी कार्यालयांमधील कर्मचारी कामावर येऊ लागले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आता मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत

सर्वसामान्य लोकांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी सूचना मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिली.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More