बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीचे डोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

मुंबईतील जवजवळ सर्व कार्यलय सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवासा करावा लागतो. त्यात लोकल बंद असल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली. पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होतीये. यामुळे रोग पसरण्याचा धोका आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

नव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलगडलं; ‘माणसाच्या शरिरात गेल्यावर…’

नोकरीची बातमी | 1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केलं’; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण

आरबीआयची मोठी कारवाई; ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द्

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More