बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; दरमहा ‘इतके’ हजार मिळणार
मुंबई | देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून राजकारण तापलेलं असताना आता ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेत असल्याचं घोषित केलं आहे.
राज्यात शैक्षणित पात्रतेप्रमाणं सेवायोजन कार्यालयाकडं तब्बल 45 लाख बेरोजगार युवक-युवतींची नोंद आहे. तर नोंद नसलेल्यांची संख्या देखील मोठी आहे. शैक्षणिक पात्रता असून देखील नोकरी मिळत नसलेल्यांसाठी सरकारनं बेरोजगार भत्ता देण्याची घोषणा केली आहे.
नोकरी लागेपर्यंत 5 हजार रूपये भत्ता मिळणार आहे. रोजगार हवी असलेली व्यक्ती पात्र आहे. बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी काही अटी आणि शर्थी ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकार बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करणार आहे.
दरम्यान, शासनाकडून लवकरच बेरोजगार भत्त्याबाबत नियमावली जाहीर होणार आहे. या नियमावलीनूसार बेरोजगार भत्ता योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षा असणार आहे.
थोडक्यात बातम्या –
हौसलों की दौड! दिव्यांग मुलीनं जिंकली सर्वांची मनं, प्रेक्षकही भावूक; पाहा व्हिडीओ
‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत
शेलारांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी”
“बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट मुख्यमंत्र्यांकडेच, पंतप्रधानांनी तर नाव घेऊन कानाखाली जाळ काढला”
Comments are closed.