‘या’ एका कारणामुळे Allu Arjun ने 10 कोटींची ऑफर धुडकावली!

Allu Arjun | दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनने आतापर्यंत चित्रपटात केलेल्या वेगवेगळ्या भूमीकेमुळे चाहत्यांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. ‘पुष्पाः द रुल’ या चित्रपटात त्याने केलेल्या भूमिकेने त्याची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढली आहे.

सोशल मीडियावर सुद्धा अल्लू अर्जुनची जबरदस्क फॅन फोलोइंग आहे. फक्त त्याच्या भूमिकेमुळेच नाहीतर त्याच्या फिटनेसमुळे सुद्धा तो कायम चर्चेत असतो. मात्र अल्लू अर्जुनबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांनी चक्क करोडोची ऑफर नकारल्याने सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.

अल्लू अर्जुनने ऑफर का नाकारली?

बाॅलिवूडमधील दिग्गज कलाकर अजय-अक्षय-शाहरुख हे तांबाकूची जाहिरात करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत असताना दिसत असते. मात्र अल्लू अर्जुनने दारूच्या जाहिरातीसाठी नकार दिला आहे. त्यामुळे त्याचं कौतुक केलं जात आहे.

10 कोटींची ऑफर धुडकावली

अल्लू अर्जुनला ऑफर केलेल्या ब्रँडची इच्छा होती की जेव्हा पण पुष्पा चित्रपटात धुम्रपान करेल किंवा तंबाकू खाईल तेव्हा ते सगळं स्क्रिनवर दाखवण्यात यावं. त्यासाठी त्या ब्रॅंडनं निर्मात्यांना तब्बल 10 कोटींसाठी ऑफर केली होती.

मात्र अल्लू अर्जुननं याला नकार दिला. तो अशा कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू इच्छित नाही. अल्लू अर्जुननं कोणत्याही जाहिरातीला नकार देण्याची ही पहिली वेळ नाही. आधी सुद्धा अल्लू अर्जुनने जाहीराती नाकारल्या आहेत.

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर एका तंबाकूच्या ब्रँडनं छोट्या पडद्यासाठी जाहिरात करण्यासाठी खूप मोठी रक्कम देण्याचं सांगितलं होतं. मात्र अल्लू अर्जुननं त्या ऑफरला नकार दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

‘पुष्पा द रुल’ या चित्रपटाच्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला त्याच्या बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला.  दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा फर्स्ट लूकचं पोस्टर शेअर केलं होतं.

News Title : Allu Arjun rejects crore rupees for this

थोडक्यात बातम्या-

Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल

Aishwarya Rai-अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नाही, मोठी माहिती समोर!

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा