Loading...

गुजरात भाजपच्या जाळ्यात अडकला मोठा मासा!

अहमदाबाद | गुजरातचे युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी भाजपत प्रवेश केला आहे. अल्पेश यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांनी 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार केला होता. भाजपने काठावर पास होत बहुमताचा आकडा गाठला आणि काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली होती.

Loading...

काँग्रेसच्या तिकीटावर अल्पेश आमदार झाले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी साबरकांठा मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र काँग्रसने याकडे दुर्लक्ष करत जगदीश ठाकोर यांना उमेदवारी दिली.

गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-नेत्यांचं पक्षांतर थांबता थांबेना! राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजप प्रवेश फिक्स

-मायावतींच्या भावाला आयकर विभागाचा दणका; केली मोठी कारवाई

-“विधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार म्हणजे आणणार”

Loading...

-वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

-पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

Loading...