गोरे होण्यासाठी मोदी रोज 4 लाखाचे मश्रूम खातात!

अहमदाबाद | नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचं ‘स्टॅडर्ड ऑफ लिव्हिंग’ चांगलंच बदललं आहे. दिवसातून दोन-दोन तीन-तीन वेळा ते आपली वेशभूषा बदलतात. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पाठिंबा दिलेला ओबीसी नेता अल्पेश ठाकूरनं मोदींच्या गोरेपणाचं रहस्य सांगितलं आहे. 

नरेंद्र मोदी मश्रूम खाऊन गोरे झालेत, असा दावा अल्पेशनं केला आहे. हे साधेसुधे मश्रूम नाहीत तर ते तैवानहून खास मागवण्यात आलेले आहेत, असं अल्पेशचं म्हणणं आहे. तसेच मोदी रोज 5 मश्रूम खातात, एका मश्रूमची किंमत 80 हजार रुपये असल्याचा धक्कादायक दावा अल्पेशनं केलाय. 

अल्पेश ठाकूरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरु झालीय. काहीजण मोदींच्या या कृतीचं समर्थन करत आहेत, तर काही जणांकडून टीका सुरु आहे.