बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब…यंदा हापुस आंब्याच्या किमतीने मोडला 100 वर्षांचा रेकाॅर्ड

मुंबई | कोकणातील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आंबा म्हणून ओळखला जातो. सध्या काही प्रमाणात आंबा हळुहळु बाजारात उपलब्ध होत असताना दिसून येत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याचा मोसम सुरु होतो. यंदाही आता हापूस आंबा हळुहळु बाजारात दाखल होत आहे.नुकत्याच सुरू झालेल्या मोसमात आंब्याची मर्यादित प्रमाणात बाजारात आवक होत आहे. कोकणातील आंब्याला जगभरातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘मायको’ आणि ‘ग्लोबल कोकण’ या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आणि हा देशातील पहिलाच मॅंगो टेक प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात आहे.

कोकणातील दहा बागायतदारांच्या आंब्यांचा लिलाव करण्यासाठी 5 मार्च रोजी मुंबईच्या अंधेरीतील जे डब्ल्यू मॅरियटमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजापूर मधील बाबू आवसरे या आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या पाच डझन आंब्यांना अंधेरीच्या एका व्यापाऱ्याने तब्बल 1 लाख 8 हजार रुपये देऊन विकत घेतले.

गेल्या शंभर वर्षांमध्ये आंब्यांना एवढी विक्रमी किंमत कधीही मिळालेली नव्हती ‘मायको’ या ब्रँडची पहिली पेटी उद्योजक राजेश अथायडे यांनी एक लाख आठ हजार रुपयांना लिलावात विकत घेतल्याने बाजारात त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सुरुवातीच्या काळातच आंब्यांना एवढी विक्रमी किंमत मिळाल्याने येणाऱ्या काळात आंब्याचे भाव गतवर्षीपेक्षा वाढतील अशी चिन्ह दिसून येत आहेत. वादळामुळे कोकणच्या आमराईंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यामुळे, यावर्षी आंबा बाजारात दाखल होताना तो दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात उपलब्ध होईल. अशा चर्चा असताना आता आंबा लाखात विकल्या गेल्याने यावर्षी कोकणचा हापूस खाण्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

थोडक्यात बातम्या-

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

एक महिन्याच्या मुलीचा आईनेच घेतला जीव; कारण ऐकून सुन्न व्हाल

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

“…त्या महिलांचीच चुकी आहे; मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत”

…अन् भररस्त्यात तो वाजले की बारावर थिरकला; रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More