नवी दिल्ली | अल्ट न्यूजचे सहसंपादक मोहम्मद जुबेर यांनी न्यायालयात जामिनाची मागणी केली आहे. त्यांची मागणी मान्य करत त्यांना न्यायालयाने 5 दिवसांचा अंतरिम जामिन दिला आहे. त्यांना दिल्ली पोलिसांनी 2018 साली आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अटक केली होती. दिल्लीच्या अधिकार क्षेत्रात रहाण्याच्या अटीवर त्यांना जामीन मिळाला आहे.
गुरुवारी झुबेर यांनी न्यायालयात जामिन अर्ज केला होता. उत्तर प्रदेशात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. काही हिंदु संघटनांच्या नेत्यांनी ते समाजात द्वेष पसरवत असल्याची तक्रार केली होती. न्यायमुर्ती इंदिरा बॅनर्जी आणि जे. के. महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. त्यांच्या वकील गोंसालविस यांनी जुबेर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे न्यायालयात सांगितलं.
जुबेर यांच्या विरोधात कोणताही गुन्हा सिद्ध केला जाऊ शकत नाही. त्यांच्या खटल्यामागे ट्विट येवढंच कारण आहे. असा युक्तीवाद जुबेर यांच्या वकील गोंसालविस यांनी न्यायालयात केला.
मोहम्मद झुबेर हे अल्ट न्यूजचे सहसंस्थापक आहेत. त्यांचे न्यूज माध्यम फॅक्ट चेकींगचे काम करते. त्यांच्यावर यती नरसिंहानंद सरस्वती, बजरंग मुनी आणि आनंद स्वरुप यांना द्वेष पसरवणारे म्हणून संबोधल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल झालेली होती आणि त्यांना अटक करण्यात आली होती.
थोडक्यात बातम्या –
‘…म्हणून आमदार शिवसेनेतून भाजपात गेले’, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
‘घरात घुसून मारलं होतं ना?’, कंगना रनौतने पुन्हा करण जोहरला डिवचलं
‘उद्धवजी अजूनही वेळ गेलेली नाही’, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना साद
ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट राज्यात सक्रीय, ‘इतके’ रूग्ण आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ
‘…तर नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.