बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुलीवर लैंगिक अत्याचार करताना तीनं अंतर्वस्त्र घातली असली तरी…”; न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षांपासून देशभरात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. अनेक कठोर कायदे आणि शिक्षा सुनावली जात असतानाही गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. शक्ती कायद्यासारखे कठोर कायदे आंध्रप्रदेेश आणि महाराष्ट्रात तयार करण्यात येत आहेत. त्यातच आता मेघालय उच्च न्यायालयानं अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराबाबत महत्त्वाची टिपणी केली आहे.

एखाद्या मुलीवर लैंगिक अत्याचार करताना मुलीने अंतर्वस्त्र घातलेली असोत अथवा नसोत हा प्रकार बलात्कारच मानला जाईल, असं मेघायल उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. कलम 375 नुसार 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावर न्यायालयाने परखड मत मांडलं आहे. या प्रकरणामधील आरोपीने मुलीची अंतवस्त्रे काढली नाहीत, असा दावा केला होता.

आरोपीने केलेल्या दाव्यावर न्यायालयाने कठोर टिपणी केली आहे. मेघायल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती संजीव बॅनर्जी आणि न्यायमुर्ती डब्ल्यु डिएंगडोह यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे. ही घटना 23 सप्टेंबर 2006 घडली होती. मुलीवरील अत्याचाराच्या सात दिवसांनंतर मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत होते. वैद्यकीय तपासणीचा हा मुख्य पुरावा आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, आरोपीने मुलीच्या अंतर्वस्त्राबाबत कोणतेही युक्तीवाद केले तरी त्याला महत्त्व दिले जाणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सदर आरोपीला ट्रायल कोर्टाने बलात्कारात दोषी ठरवून 25 हजारांचा दंड ठोठावला होता. तसेच आरोपीने गुन्हा केल्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे कोणताही युक्तीवाद केल्यास गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करता येणार नाही, असं स्पष्ट मत न्यायालयाने मांडलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेेमात पडेल, तज्ज्ञांनी सांगितली ट्रीक

“महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमतानं सरकार आणणार”

मोठी बातमी! राज्यपालांनी ठाकरे सरकारनं घेतलेला ‘तो’ निर्णय केला रद्द

उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…

“इतकं क्रूर पद्धतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More