बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1975 नंतर पावसाचा नवा विक्रम! ‘या’ कारणामुळे थांबला परतीचा पाऊस

मुंबई | गेल्या काही दिवसापासून उत्तर आणि दक्षिण भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. केरळमध्ये तुफान पाऊस झाल्यानंतर लगेच उत्तराखंड राज्यातही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. देशातील काही भागातून मान्सून परतला असला तरी राज्यात अजूनही पावसाचा मुक्काम थांबलेला आहे. त्यानंतर राज्यात आणखी काही दिवस पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

मागील 8 दिवसांपासून मोसमी वाऱ्याच्या स्थितीमध्ये हवामान खात्याने कोणतेही बदल नोंदवलेला नाही. त्यामुळे पुढील दिवसात मान्सून पुन्हा सक्रीय होऊन देशातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून माघार घेणार आहे. 1975 सालानंतर देशात पहिल्यांदाचं इतके दिवस मान्सून थांबला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यावर्षी 6 ऑक्टोबरपासून राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रीय झाला. याचा परिणाम परतीच्या पावसावर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गाचा काही भाग आणि दक्षिण भारतातील इशान्य भागात परतीचा पाऊस थांबला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून राज्यातील कोणत्याही भागात पाऊस पडणार नसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला नाही. त्यामुळे आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. तर 3 दिवसानंतर हवामान खात्याने पुण्यात ढगाळ वातावरणाची नोंद केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

आयपीएलमध्ये पुन्हा बाॅलिवूडची एन्ट्री! रणवीर-दीपिका घेणार नवीन संघ विकत

भर कार्यक्रमात आढळला बंदूकधारी व्यक्ती; योगी आदित्यनाथ यांनी थेट अधिकाऱ्यांवर कारवाई

“देशात कोणत्याही गोष्टीचा उत्सव साजरा करण्याचा नवीन पायंडा पडलाय”

‘माझ्या चेंडूमुळे सचिनची बरगडी मोडली, तरीही तो खेळत राहिला’; शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More