पुणे | पत्रकारितेच्या शिक्षणासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा वाद रंगला आहे. रानडे इन्स्टिट्यूट हे सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील माध्यम आणि संज्ञापन विभागात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे. मात्र अशातच माजी विद्यार्थ्यांनी 400 कोटींच्या भूखंडासाठी रानडेचं स्थलांतर करण्यात येत असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करून त्याचं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे. कारण रानडे इन्स्टिट्यूट हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे. या जागेची किंमत 400 कोटी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या जागेवर काही लोकांचा डोळा असल्याचा आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.
रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर केलं तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा इन्स्टिट्यूट बचाव कृती समितीने दिला आहे. तर रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करण्यामागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोपही कृती समितीने केला आहे. यावर अभ्यास करू आणि निर्णय घेऊ, असं आश्वासन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिलं.
दरम्यान, अनेक प्रसिद्ध नामांकित पत्रकारांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या पत्रकारितेच्या शिक्षणाबाबत एक दर्जा आहे. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर होतं की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्या बातम्या-
ईडीचा अविनाश भोसलेंना दणका, केली ‘ही’ मोठी कारवाई!
भाजप असं आडवं पडलं आहे की आम्ही इथून उठणारच नाही- संजय राऊत
2014 पासून देशाला ग्रहण लागलं- नाना पटोले
“आम्ही दगडूशेठ समोर गाऱ्हाणं मांडलं म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील झाले”
आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला, म्हणाले ‘आधीचे रेल्वे मंत्री…’
Comments are closed.