बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी काय राज कुंद्रा आहे का?’; राज ठाकरेंच्या वक्तव्यानं पिकला हशा

पुणे | येत्या फेब्रुवारीत काही महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर सध्या राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. 19, 20 आणि 21 असे तीन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यावर असतानाच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला होता.

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेच्या कार्यालयात हजेरी लावली. त्या ठिकाणी मनसे नेते वसंत मोरे आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. राज ठाकरे आल्याची माहिती कळताच पत्रकार, फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅन यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांचे फोटो काढले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांना विचारलं कान, नाक, डोळे सगळं आलं का? किती वेळ तेच तेच, मी काय राज कुंद्रा आहे का?, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला.

राज ठाकरे 3 दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते 152 शाखाध्यक्षांची भेट घेऊन प्रत्येकाशी बोलणार आहेत. तर या तीन दिवसात ते पुण्यातील 9 मतदारसंघाचा आढावा देखील घेणार आहे. त्यानंतर ते पिंपरी चिंचवडच्या देखील दौऱ्यावर असतील. पुणे आणि नाशिक महापालिकेवर सध्या मनसेचा डोळा आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.

दरम्यान, पुणे महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. पुणे महापालिकेत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोनच नगरसेवक सध्या मनसेचे आहेत. त्यामुळे येत्या महापालिकेत नगरसेवकांचा आकडा वाढवण्याची तयारी मनसेची असणार आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

पोस्टाची बंपर योजना; सेव्हिंग अकाऊंटवर मिळतंय बँकांपेक्षा जास्त व्याज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More