बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबमध्ये राजकीय खळबळ; अमरिंदरसिंग यांनी केली महत्त्वाची घोषणा

नवी दिल्ली | पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून हटवल्यावर अमरिंदरसिंग यांनी आता एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेमुळे सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. अमदिंरसिंग यांनी लवकरच स्वतंत्र पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या पंजाबचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

यावेळी अमरिंदरसिंग म्हणाले, ‘पुढच्या वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आमचा पक्ष स्वतंत्रपणे उतरेल, पक्षाचं नावही लवकरच जाहीर करू, यावेळी 117 जागा आम्ही लढवणार आहोत. आमच्यासोबत अनेक काँग्रेस नेते आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर आम्ही त्या नेत्यांची नावे जाहिर करू’, असं त्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय भाजपसोबत आघाडीच्या मुद्द्यावर ते म्हणाले, आम्ही स्वबळावर लढणार की आघाडी करणार?, याचं उत्तर लवकरच मिळेल. आम्ही भाजपसोबत जाणार आहोत, असं कधीच म्हणालो नव्हतो. जागावाटपाचा प्रस्ताव आल्यास विचार करु, असं आम्ही म्हणालो होतो.

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. त्यातच अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. याशिवाय अमरिंदरसिंग स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर भाजपसोबत आघाडी करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता अमरिंदरसिंंग यापुढे काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

काश्मीरमध्ये बनतोय ज्वालामुखी; फारुख अब्दुल्लांचा भाजपवर हल्लाबोल

“ते आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील”

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांच्या मासिक वेतनाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

शेतकऱ्यांनो आता सातबारा काढा घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये; कसं ते वाचा सविस्तर

समीर वानखेडेंचा आणखी एक जुना फोटो शेअर करत मलिक म्हणतात, मला तर…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More