बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायेत अन्…”, काँग्रेसचा हल्लाबोल

चंदीगड | काही दिवसांपुर्वीच काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह आणखी चार नेत्यांनी देखील राजीनामा दिल्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे अमरिंदर सिंग यांच्यावर काँग्रेस सध्या आक्रमक झाली असून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. अशातच आता पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

अमरिंदर सिंग भाजपला मदत करत असल्याचा गंभीर आरोप हरिश रावतांनी अमरिंदर सिंग यांच्यावर केला आहे. यावेळी अमरिंदर सिंग यांनी दबावामुळे आणि जबाबदारी झटकण्यासाठी राजीनामा दिला असल्याचं देखील म्हटलं आहे. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

पक्षाने अमरिंदर सिंग यांना असं काही करण्यास सांगितलं नव्हतं, उलटं पक्ष सोडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी अमरिंदर सिंग पक्षाला मार्गदर्शन करतील असा आमचा समज होता, असं हरिश रावत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भाजप त्यांच्यावर मोठा दबाव टाकत असून वेळच्या वेळी प्रश्न सोडवले असते तर ही वेळ आलीच नसती, अशी खोचक टीका हरिश रावतांनी केली आहे.

दरम्यान, यानंतर अमरिंदर सिंग यांच्या पत्नी काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. अमरिंदर सिंग हे एक सैनिक असल्यामुळे या युद्धामध्येही ते नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास अमरिंदर यांच्या पत्नी खासदार परनीत कौर यांनी व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर अमरिंदर सिंग भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे कृषी आंदोलन संपवण्यासंदर्भात लवकरच चांगली बातमी समोर येईल, असं देखील परनीत कौर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून जगभरातील फेसबुक सर्व्हर झालं होतं ठप्प; तब्बल एवढ्या हजार कोटींचं नुकसान

“त्याच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा”

आता विदर्भातील ‘या’ शहरात होणार नवं विमानतळ; पुढच्याच वर्षी होणार प्रवासी वाहतूक

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

परतीच्या पावसामुळे ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढचे 4 दिवस धोक्याचे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More