बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही”

नवी दिल्ली | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. राजीनामा देता वेळी अमरिंदर सिंग यांनी पंजाब काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या गंभीर आरोप केले होेते. अमरिंदर सिंग आता पंजाबमध्ये नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नवज्योत सिंग सिद्धूंवर निशाणा साधला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांना काहीही माहिती नाही. ते जास्त बोलतात परंतु त्यांना मेंदू नाही. मी कधीही पक्ष प्रवेशबाबत अमित शहांशी बोललो नाही, परंतु मी लवकरच यासंबंधित बोलणार आहे. काॅंग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पार्टी विरोधात भक्कम आघाडी स्थापन करणार आहे. सिद्ध ज्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा राहतील, त्याठिकाणी आम्ही भक्कम उमेदवार देऊ, असंही अमरिंदर सिंग म्हणाले.

आमच्या संपर्कात अनेक बडे काॅंग्रेस नेते आहेत. त्यांची नावे आम्ही नव्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर जाहीर करू. आमचा पक्ष स्वबळावर लढेल की आघाडीसोबत लढेल याची माहिती नंतर देऊ, परंतु पंजाबमधील सर्वच्या सर्व 117 जागा आमचा पक्ष लढणार आहे. नव्या पक्षाची घोषणा लवकरात लवकर करणार आहे. त्यासाठी आमचे वकिल निवडणुक आयोगाकडे यासंदर्भात चर्चा करत आहेत, असंही अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाब काॅंग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. आगामी काळात पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी वक्तव्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

30 वर्ष जुना प्रश्न संपुष्टात, फडणवीसांनी मानले मोदी-शहांचे आभार

“नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल”

“पेगासस प्रकरणाची ऑर्डर पंतप्रधान मोदींनी किंवा गृहमंत्र्यांनी दिली”

“अनिल देशमुख कुठं आहेत याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं”

एमपीएससीची मोठी घोषणा! PSI, STI, ASO मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More