बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; ‘या’ दिवसापासून घेता येणार ऑनलाईन दर्शन

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट हळुहळु ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या वर्षीही अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. याआधीही अमरनाथ यात्रा दहा दिवसांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सध्याची परिस्थिती पाहता अखेर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षीही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली. दरम्यान, भाविकांना 28 जूनपासून ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

अमरनाथ यात्रा रद्द झाली असली तरी बाबा बर्फानी गुहेत सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सर्व पुजा अर्चेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या आरतीचे लाइव्ह टेलिकास्ट करून भाविकांना व्हर्च्युअल दर्शन घेता येईल, असंही बोर्डाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात येतं. देशाच्या तसंच जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात.

थोडक्यात बातम्या – 

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

मोठी बातमी! शिवसेना आमदार संजय रायमुलकरांनी ‘या’ कारणाने घेतली धरणात उडी; पाहा व्हिडीओ

“भाजप कृतघ्न, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नाही”

“महाराष्ट्र सरकारने पळवाट न काढता निदान 15 दिवस तरी अधिवेशन बोलवावं”

सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये, बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More