देश

अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली | देशाच्या एखाद्या भागातील लोकांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना न्याय कसा देणार? असा प्रश्न नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी भाजप सरकारला विचारला आहे.  मोदी सरकारने जम्मू-काश्मिरमधून कलम 370 आणि कलम 35 अ हटवण्याच्या निर्णयावर अमर्त्य सेन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीवादी देशात अशी दडपशाही करून एखादा निर्णय नागरिकांवर लादणे एक भारतीय म्हणुन मला हे पटलेलं नाही, असं सेन म्हणाले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

ज्यांनी लोकांचं प्रतिनिधीत्व केलं… सरकार चालवलं… त्यांना नजरकैदेत ठेवलं. लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा आवाज न ऐकता तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 200 वर्षांपुर्वी ब्रिटिश ज्या पद्धतीने देशाचा कारभार चालवत होते. तसं सध्या देशात सुरू आहे, असं म्हणत अमर्त्य सेन यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!

-पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे

-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’

-शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या