आश्चर्यकारक! आता गाय दिवसाला 150 लीटर दूध देणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | दूध (Milk) आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक गरज आहे. रोज आपण दूध पितो. हे दूध गाय किंवा म्हशीपासून आपल्याला मिळतं. शक्यतो गाय दिवसाला कमीतकमी 10 ते 20 लीटर दूध देते. आम्ही तुन्हाला सांगितलं की आता गाय तुम्हाला दिवसाला 150 लीटर दूध देईल तर,असं आम्ही नाही चीनच्या संशोधकांनी दावा केला आहे.

चीनच्या तीन शास्त्रांनी दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेल्या या सुपर गाय दिवसाला 150 लीटर दूध देऊ शकतात. क्लोनिंगच्या (Cloning) मदतीने त्यांनी हे तंत्रज्ञान तयार केलं आहे. चीनच्या एका रिपोर्टनुसार चीनच्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, एका गाय (cow) वर्षात 17,500 लीटर दूध देते. चीनने बनवलेली ही गाय एका दिवसात 100 ते 150 लीटर दूध देऊ शकते.

चीनच्या (China) नाॅर्थविस्ट युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल अ‌ँड फाॅरेस्ट्री सायन्स अँड टेक्नाॅलाॅजीच्या शास्त्रज्ञांनी 3 सुपर काउ क्लोन तयार केले आहेत. शास्त्रज्ञ सुपर काऊचे 1000 क्लोन तयार करतील. यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. गायीचा क्लोन कसा तयार करण्यात आला याबद्दल शास्त्राज्ञांनी माहिती दिली.

गायींच्या कानाजवळ टिश्यू घेऊन आणि नंतर त्या भ्रूणांचे 120 गायींमध्ये प्रत्यारोपण करुन भ्रूण (Embryo) तयार केले गेले. यामुळे 42 गाई गर्भवती राहिल्या असून यातून तीन सुपर गायींचा जन्म झाला आहे. 17.5 टक्के गाईंचा जन्म पुढच्या काही दिवसात होईल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, चीनमधील गायीच्या दूधाचे उत्पादन वाढवण्यासाठी हे करत असल्याचं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या