बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Amazon ची iPhone प्रेमींसाठी भन्नाट ऑफर; जाणून घ्या…

नवी दिल्ली । सध्या अनेक ग्राहक Online Shopping ला प्राधान्य देत आहेत. Amazon, Myntra, Flipkart यांसारख्या अनेक अॅपद्वारे ग्राहक Shopping करतात. Amazon वर ग्राहकांसाठी बऱ्याच ऑफर देखील दिल्या जातात आणि त्या ऑफर लोकांच्या पसंतीस देखील उतरतात.

आता अशीच एक भन्नाट ऑफर Amazon ने ग्राहकांच्या भेटीस आणली आहे. Amazon Great Indian Festival सेलचा Teaser समोर आलाय. ज्यामधून iPhone 12 च्या भन्नाट ऑफरची माहिती मिळत आहे. iPhone 12 हा आत्तापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत मिळणार आहे.

Apple च्या अधिकृत वेबसाईटवर iPhone 12 ची किंमत 59,000 रुपये आहे. पण Amazon वर हीच किंमत 57,900 रुपये इतकी होती. मात्र आता Teaser मध्ये दाखवल्याप्रमाणे iPhone हा 40 हजारपेक्षाही कमी किंमतीत मिळणार आहे. ही किंमत iPhone 12 मध्ये 64 GB, 128GB, 256GB स्टोरेज असणार आहे.

iPhone 12 मध्ये 6.1 इंचचा Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे. याशिवाय iPhone मध्ये Apple A14 बायोनिक चिपसेट आणि 4GB रॅमसह आऊट ऑफ बॉक्स iOS 14 ही आहे. iPhone 12 मध्ये 12 मेगापिक्सेलच्या Wide Angle Lense असणारा Dual Camera आहे.

कॅमेरामध्ये Optical Image Stabilization देण्यात आलंय. तसंच Selfie Camera देखील 12 मेगापिक्सेलचा आहे. iPhone 12 मध्ये 5G सपोर्ट देखील देण्यात आला आहे. आयफोन 12 हा 2020 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. तेव्हा या फोनची सुरूवातीची किंमत 79,999 रुपये इतकी होती. 

यामध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, NFC, Lightening आणि Dual sim support देण्यात आलाय. आयफोन 12 मध्ये MagSafe Wireless चार्जर देखील देण्यात आला आहे. सेन्सरसाठी आयफोन 12 मध्ये Face Unlock, 3D Face Recognization, Compass/Magnometer sensor यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

बॅटरी बॅकअपच्या दृष्टीने आयफोनमध्ये 20W फास्ट चार्चिंग सपोर्ट देणारी 2815 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. आयफोन 12 हा तुम्ही Black, Red, White, Green, Blue आणि Purple एवढ्या कलरमध्ये बाजारात उपलब्ध आहे. 

थोडक्यात बातम्या-

Toyota ची सर्वात जबरदस्त कार लवकर भारतात लाँच होणार!

दसरा मेळावा कोणाचा?; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More