बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आश्चर्यकारक! कोरोना लस घेतल्यानंतर तासाभरात पॅरालिसीस बरा झाला – रुग्णाचा दावा

भोपाळ | कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत. मात्र अनेक लोकांना अजूनही लसीकरण करण्याविषयी भीती वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एका व्यक्तीनं लस घेतल्याच्या तासाभरातच पॅरालिसीस ठीक झाल्याचा दावा केल्याचं समोर येत आहे.

मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचे रहिवासी अब्दुल मजीद खान यांना गेल्या सहा-सात महिन्य़ांपासून त्यांना पॅरालिसीस झाला होता. कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासानं त्यांना फरक जाणवायला लागला. लस घेतल्यानंतर काही वेळातच त्यांचे लकवा मारलेले अवयव हलविता येऊ लागले. यामुळे खान हे आता कोरोना लसीला वरदान म्हणू लागले आहेत.

राजगढ जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. सुधीर कलावत यांनी सांगितलं की, त्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली होती. त्यांच्या दाव्यानुसार ते पॅरालिसीसपासून बरे झाले आहेत. हा चमत्कार सायकॉलॉजीकल किंवा लसीचा परिणाम असू शकतो. काहीही असले तरी यावर अभ्यास होण्याची गरज आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अब्दुल मजीद खान लकवा मारला होता. अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र काहीच फरक पडला नव्हता. मात्र कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासानं त्यांना फरक जाणवायला लागला.

थोडक्यात बातम्या – 

पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित; कमी झालेली संख्या पुन्हा वाढली

“कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण…”

माझ्या 100 वर्षीय आईनेही लस घेतली, घाबरू नका- नरेंद्र मोदी

तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार- शरद पवार

औरंगाबाद हळहळलं; शस्त्रक्रीया करताना डाॅक्टरला ह्रदयविकाराचा झटका

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More