अॅमेझॉनची घोडचूक, स्टीकरवरील नकाशातून काश्मीर वगळलं

नवी दिल्ली | ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर भारताच्या नकाशाबाबत पुन्हा एकदा घोडचूक करण्यात आली आहे. साईटवर विक्रीस असलेल्या भारताच्या नकाशाच्या स्टीकरमधून काश्मीरचा भाग वगळण्यात आला आहे. भाजप नेते तजिंदरपाल बग्गा यांनी ट्विटरद्वारे ही बाब लक्षात आणून दिली आहे. 

यापूर्वीही चुकीच्या उत्पादनांवर भारताचा नकाशा वापरल्याने अॅमेझॉन अडचणीत सापडली होती. त्यामुळे आताही अॅमेझॉनला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या