मुंबई | अॅमेझॉन आता भारतात 20 हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या नोकऱ्या कंपनी ग्राहकांच्या सेवेनुसार देणार आहे.
सर्व नव्या नोकऱ्या देशातील हैद्राबाद, पुणे, नोएडा, कोलकत्ता, जयपूर, चंदीगढ, मंगळूर, इंदोर, भोपाळ, कोइम्बतुर आणि लखनऊ या 11 शहरात दिल्या जाणार आहेत.
अॅमेझॉनच्या सर्वाधिक नोकऱ्या या व्हर्चुअल कस्टमर सर्व्हिस प्रोग्राम यामध्ये असणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार काम करुण्याची सुविधा मिळणार आहे. या नोकऱ्यांसाठी कुणीही अर्ज करु शकता. अर्जदार दहावी पास असणं अनिवार्य आहे.
इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, आणि कन्नड भाषां लिहिता, वाचता येणं गरजेचं आहे. या नोकऱ्या तात्पुरत्या असणार आहेत. कंपनीच्या गरजेनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर वर्षाच्या शेवटी त्यांना परमनेंट केलं जाऊ शकतं, असं अॅमेझॉन इंडियाने सांगितले.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली; एक्स्प्रेस वेवर अपघात
काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको- मायावती
विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात
धक्कादायक! भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण