तंत्रज्ञान

काय सांगता!; ‘वन प्लस’च्या ‘या’ फोनवर तब्बल सात हजार रुपयांची सूट

Loading...

नवी दिल्ली | वन प्लस 7 टी प्रो या स्मार्टफोनवर तब्बल 7 हजार रूपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. वनप्लसने ही ऑफर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अ‌ॅमेझॉन इंडियावर सुरू केली आहे.

अ‌ॅमेझॉन इंडियावर सुरू असलेली ऑफर कॅश ऑन डिलिव्हरीवर दिली जात नाही. ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे. हा फोन खरेदी करताना ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केल्यास 2 हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

जुना फोन एक्स्चेंज करायचा असल्यास 2 हजारांचा वेगळा कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर सर्व डिव्हाईससाठी लागू होणार नाही. जर एसबीआय क्रेडिट कार्डवरून ईएमआयचा पर्याय निवडला तर ग्राहकांना 3 हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे.

दरम्यान, फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि एक टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

“कमळाबाईला शिवसेनेनं कधीच सोडलंय”

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी ‘हे’ उपाय करा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या