Amzaon ची कर्मचारी कपात सुरुच; ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना देणार नारळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | 2023 मध्ये जगात मोठी मंदी येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच जगातील मोठी अशी ई-काॅमर्स कंपनी अ‌ॅमेझाॅनची (Amzaon ) कर्मचारी कपात सुरुच आहे. जानेवारीच्या अगदी काही दिवसांपूर्वी अ‌ॅमेझाॅनने त्यांच्या 18,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचं जाहीर केलं होत.

अ‌ॅमेझाॅनने वाॅशिंग्टनकडे (Washington) पाठवलेल्या नोटीसनुसार पुन्हा एकदा अ‌ॅमेझाॅन आता मोठी कर्मचारी कपात करणार आहे. अ‌ॅमेझाॅनने सुमारे 2,300 कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याचं जाहीर केलं आहे. कंपनीच्या वार्न अॅॅक्टद्वारे कर्मचाऱ्यांना कपातीची नोटीस देण्यात येणार आहे.

सिएचलमधील 1,852 तर वाॅशिंग्टनमधील बेलेव्ह्यूमधील 448 कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जागतिक स्तरावर अंदाजे 18,000 काॅर्पोरेट आणि टेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

होत असलेल्या मंदीचा सगळ्यात जास्त परिणाम टेक कंपन्यांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. माय्रकोसाॅफ्ट (Microsoft) कंपनीनेदेखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. त्यांनी सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

2023 मध्ये संपूर्ण जग मंदिच्या गर्तेत आहे. 2022 मध्ये देखील अनेक कंपन्यांनीं मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कामगार कपात केली होती. सध्या अ‌ॅमझानने केेलेल्या घोषणेमुळे कर्माचारी संकटात येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या