मुंबई | मराठी भाषेचा पर्याय अॅमेझॉनवर असलाच पाहिजे अशी प्रमुख मागणी मनसेने केली होती. यावरून राज ठाकरेंना नोटीस गेल्याने आज उमटलेल्या खळखट्याकवरून अॅमेझॉनने माघार घेतली आहे.
पुढील सात दिवसांत अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असं आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. अॅमेझॉनकडून मनसेला तसं कळवण्यात आलं आहे.
अॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 5 जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसैनिक प्रचंड संतापले होते.
महाराष्ट्रातील अमेझॉनचे पहिले कार्यालय असणाऱ्या कोंढवा येथील अमेझॉनच्या ऑफिसवर शुक्रवारी सकाळी मनसैनिकांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर दुपारी मुंबईच्या चांदिवली परिसरातील अमेझॉनच्या गोदामाची स्थानिक कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.
थोडक्यात बातम्या-
“माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत”
वाढदिवसानिमित्त रामदास आठवलेंना गृहमंत्र्यांकडून काव्यात्मक शुभेच्छा!
“पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, मी कोल्हापूरला परत जाणार आहे”
“भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात”
शिवसेनेच्या खासदाराने केली ‘या’ दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री बदलण्याची मागणी