Google ला मागे टाकत जगात ‘ही’ कंपनी ठरली अव्वल

नवी दिल्ली | सर्वाधिक ब्रॅड मूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ‘गुगल’ ला मागे टाकत ‌‌’अ‌ॅमेझॉन’ या कंपनीने प्रथम स्थान मिळवलं आहे. ‘अ‌ॅमेझॉन’ नंतर या यादित ‘अ‌ॅपल’ आणि ‘गुगल’ या कंपन्या आहेत.

जागतिक बाजारात काम करणाऱ्या कंपन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘कॅन्टर’ या संस्थेने आघाडीच्या 100 कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.

कॅन्टर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार अ‌ॅमेझॉनच्या ब्रॅंड मूल्यात 52 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 315 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहेत.

दरम्यान, ट्रस्ट रिसर्च या कंपनीच्या अहवालानुसार अ‌ॅमेझॉन इंटरनेटवरील सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड असल्याचं समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-फेसबुकवर दिवसाला ३ लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी

-मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मूर्ख बनवू शकत नाही; डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर चिडले

-“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार”

-रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली ‘ही’ ऑफर

-ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता