Amazon चा मोठा निर्णय; कर्मचारी संकटात?

नवी दिल्ली | जगातील सर्वात मोठी ई-काॅमर्स कंपनी अ‌ॅमेझाॅनने (Amazon) पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अ‌ॅमेझान कंपनीत काम करणारे कर्मचारी संकटात येण्याची शक्यता आहे.

2022 मध्ये देखील अ‌ॅमेझाॅॅनने 11,000 लोकांना काढून टाकलं होत. यावेळी देखीन अ‌ॅमेझान मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. या आकडा पूर्वीपेक्षा अधिक असू शकतो.

वाॅल स्ट्रीट जर्नलनुसार (The Wall Street Journal) अ‌ॅमेझाॅनने नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचारी कपात सुुरु आहे. यावेळी कर्मच्याऱ्यांची करण्यात येणारी कपात पूर्वीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. ही संख्या 18,000 पेक्षा जास्त असू शकत.

अद्याप कंपनीने याबाबत सविस्तर वृत्त जाहीर केलेलं नाही. आपला खर्च कमी करण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय कंपनीन घेतला आहे.

2023 मध्ये संपूर्ण जग मंदिच्या गर्तेत आहे. 2022 मध्ये देखील अनेक कंपन्यांनीं मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. 2023 च्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा अ‌ॅमझाॅनने हा निर्णय दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या