Top News मुंबई

मनसेचं खळखट्याक! पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली

मुंबई | ॲमेझाॅन आणि मराठी भाषेचा मुद्दा यांच्यातील वाद चिघळल्याचं दिसून आलंय. या मुद्द्यावरून मनसे प्रचंड आक्रमक झालीये. मनसेने मुंबईतील अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत.

यापूर्वी मनसेने पुण्यातील अॅमेझॉनची कार्यालयं देखील फोडली होती. तर आता पुण्यानंतर मुंबईच्या चांदिवलीतीलमधील अ‍ॅमेझॉनच्या 2 कार्यालयांत घुसून तोडफोड केलीये.

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोंढव्यातील ॲमेझॉनची कार्यालयाची फोडली. कार्यालयांची तोडफोड करताना कार्यकर्त्यांना ‘मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही’ अशी घोषणाबाजी करण्यात आलीये.

दरम्यान या प्रकरणी अ‍ॅमेझॉनने थेट न्यायालयात धाव घेतलीये. यासंबंधी दिंडोशी न्यायालयाकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलीये. या नोटीसीनुसार, राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

थोडक्यात बातम्या-

अंकिता लोखंडेनं बाॅयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला; खाली कमेंटचा पाऊस पडला!

कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी सुरू होतोय; मनसेची राज्य सरकारवर टीका

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या