Loading...

या नेत्यामुळे माझा विजय पक्का- अंबादास दानवे

औरंगाबाद | अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या 110 मतांच्या पाठिंब्यामुळे माझा विजय पक्का असल्याचं युतीचे उमेदवार अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारसंघात आज(सोमवार) निवडणूक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

विधान परिषदेच्या या जागेसाठी युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्यात मुख्य लढत बघायला मिळाली. विधान परिषद निवडणुकीत 98.50 टक्के मतदान झालं. 657 पैकी 647 जणांनी मतदान केलं.

Loading...

एकूण मतदानापैकी 336 मतं युतीकडे असल्याने अंबादास दानवेंचा विजय पक्का मानला जात आहे. त्यातच अब्दुल सत्तार यांनी आपलं वजन युतीच्या पारड्यात टाकलं. त्यामुळे अंबादास दानवे विजयाच्या जवळ असल्याचं दिसतंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी सत्तार याच्या भाजप प्रवेशाच्या खुमासदार चर्चा बघायला मिळाल्या. या निवडणुकीत त्यांनी युतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेना नेते विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका

-या प्रमुख आश्वासनासह प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा केला प्रसिद्ध!

-तुमची चूक नसेल आणि नोटीशीत काही तथ्य नसेल तर घाबरू नका- गिरीश महाजन

Loading...

-पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश लांडगेंनी घेतला स्तुत्य निर्णय

-तिकीट नाकारलेल्या किरीट सोमय्यांकडे भाजपने सोपावली ही जबाबदारी!

Loading...