बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंबादास दानवेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…

औरंगाबाद | शिंदे गटात सामिल होण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला फोन केला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केला होता. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. शिंदे यांनी अंबादास दानवे यांना फोन करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

शिंदे म्हणाले, अंबादास दानवे हे माझ्यासोबतच्या आमदारांच्या कुटुंबीयांना फोन करत होते, म्हणून मी त्यांना फोन केला होता. ते मुंबईतील मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परीषदेत बोलत होते. मी त्यांना बंडखोरी करा, असे सांगण्यासाठी किंवा आमच्यासोबत या, म्हणून फोन केला नव्हता. असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला.

अंबादास दानवे हे आमच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना, पत्नी आणि मुलांना फोन करुन आमदारांना सांगा माझा फोन आला होता, असे सांगत होते. त्यामुळे मी त्यांना अशा फोनमागची कारणे विचारण्यासाठी संपर्क केला होता. तुम्हाला कोणी काही अधिकार दिले आहेत का? तुम्ही बॉस आहात का? हे विचारण्यासाठी मी त्यांना फोन केला होता, असं शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अंबादास दानवे म्हणाले, एखाद्या नेत्याचे कोणावर उपकार असतील तर ते फक्त शिवसेनेला समोर ठेऊन होते. कोणी म्हणेल की मी तुला खूप मदत केली. पण ती मदत पक्षासाठी होती. व्यक्तीसाठी नाही. शिंदे यांनी मला त्यांच्या गटात सामिल होण्यासाठी फोन केला होता. मी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, असे मी त्यांनी सांगितले. त्यांनतर ते मला म्हणाले, मी निवडणुकीत तुला मदत केली. त्यावर मी त्यांना सांगितले तुम्ही शिवसेना पक्षाला मदत केली मला नाही, असा गौप्यस्फोट दानवेंनी केला.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रपती झाल्यानंतर दौपदी मुर्मूंना मिळणार ‘इतका’ पगार; बंगला आणि गाड्यांसह सुरक्षाही सर्वोच्च

ओबीसी आरक्षणाचे आम्हीच जनक! भाजप-शिवसेनेत श्रेय घेण्यासाठी चढाओढ

नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा!

“चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून, त्यावरही उत्तर मागाल”

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये” 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More