बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात”

मुंबई | शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना विरुध्द शिंदे गट आणि भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. रोज सकाळ संध्याकाळ शिवसेना बंडखोरांवर टीका करत आहे, तर बंडखोर आमदार शिवसेनेवर. यांच्या दोघांच्या भांडणात भाजप आणि भाजपचे नेते आपली पोळी भाजून घेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र शिवसेेनेवर आरोप करत आहेत. राणेंच्या या आरोपांवर आता शिवसेना (Shivsena) आक्रमक झालेली आहे.

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. दानवे म्हणाले, नारायण राणे यांचे बोलणे आणि त्यांना फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही, ते भाजपच्या तुकड्यांवर जगतात. बाळासाहेबांच्या विचाराने शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली, पण त्यांच्या विचारांना छेद करुन गद्दारी सुद्धा राणेंनी केली. पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) असताना, तो स्वत: चा करण्याचा प्रयत्न राणेंनी केला होता.

नारायण राणेंचा शिवसेना संपविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली हाणून पाडला. म्हणून आजही या धक्क्यातून नारायण राणे सावरू शकले नाहीत. नारायण राणे (Narayan Rane) जेवढे आमदार घेऊन गेले त्यांचे काय झाले? त्यांचे आज राजकीय अस्तित्व आहे का? असा प्रश्न नारायण राणेंनी स्वत:लाच विचारावा, असे देखील दानवे यांनी म्हटले.

दरम्यान, नारायण राणेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलाखतीवरुन त्यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेला मी 39 वर्षे ओळखतो. उद्धव ठाकरेंच्या अंगात खोटारडेपणा आहे, कपटीपणा आहे आणि दृष्ट बुद्धी आहे. अशा व्यक्तीने मुख्यमंत्रीपदी बसून ना जनतेचे, ना शिवसैनिकांचे आणि ना हिंदुत्वाचे काम केले. आजारपण आणि मातोश्री एवढ्यावर ते मर्यादीत होते, असे नारायण राणे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या –

‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे म्हणतात…

वाढदिवस उद्धव ठाकरेंचा पण चर्चा होतेय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांची

‘याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय लक्षात ठेवा’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

“उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेले, त्यांना नारायण राणेंनी परत आणलं”

‘घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के’, महामुलाखतीवरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More