Ambadas Danve | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेतला. राज्यातील 18 ते 65 वय वर्षाच्या महिलांच्या बँक खात्यात महिना 1500 रूपयांची आर्थिक मदत सरकार देणार आहे. त्यानंतर आता बेरोजगारांसाठी लाडका भाऊ योजनेची सरकारने घोषणा केली आहे. ही योजना जुनी योजना असल्याचा दावा आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. माध्यमांशी बोलत असताना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“लाडका भाऊ योजना ही निव्वळ तरूणांची फसवणूक”
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना ही निव्वळ तरूणांची फसवणूक आहे. ही योजना 1974 पासून सुरू आहे. यात काहीही नवीन नाही. थोडक्यात काय तर ही जनतेची आणि तरूणांची फसवणूक आहे. ही योजना राज्यात 1974 पासून सुरू आहे. या योजनेत आधीपासून मानधन दिले जाते. यात नवीन काही नाही. थोडक्यात जनतेची ही एकप्रकारे फसवणूक आहे. ही जुनी योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने समोर आणली आहे, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) केला. या योजनेला फसू नका. निवडणुकीच्या तोंडावर सरकारला असं आठवत असल्याचं ते म्हणाले.
लाडका भाऊ बहीण ही योजना प्रत्यक्षात जुनी योजना आहे. आताच्या परिस्थितीत इंडस्ट्रीत रोजगार उपलब्ध आहे. सरकार नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरण करत आहे. सरकार हे एकीकडे तरूणांच्या योजनांच्या नावाने भूलथापा देत असल्याचं दानवे म्हणाले आहेत. (Ambadas Danve)
युवकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारचा खटाटोप
यापूर्वीपासून सुरू असलेल्या योजनेच्या नावाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने हा खटाटोप केला आहे. प्रत्यक्षात रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना आणि रोजगार मेळावे घेतले आहेत. परंतु वास्तविकरित्या तरूणांना या योजनेतून काहीही मिळालं नाही. निवडणुकीआधी ही फसवी घोषणा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात म्हणावं असं यश मिळालं नाही. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीने 17 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. यामुळे महायुतीला येणाऱ्या विधानसभेत मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे.
अशातच आता महायुतीने येत्या विधानसभा निवडणुकीत आपलं पारडं जड राहावं यासाठी योजनांची घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना योजनेतून महिना 1500 रूपय़े देण्यात येणार आहे. तसेच लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना 6 हजार ते 10 हजार रूपये देण्यात येणार आहे.
News Title – Ambadas Danve Criticised Government Ladka Bhau Yojana Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!
कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमद्वारे महिन्याला कमवा 10 हजार रुपये; जाणून घ्या अधिक
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची धुरा कुणाकडे असणार?, मोठी माहिती आली समोर
“लाडका भाऊ योजना ही 50 वर्षांआधीची जुनी योजना”; ‘या’ नेत्याचा दावा