“लाठी चार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेला होता”
मुंबई | आयोध्येतील बाबरी मशिदीवरून राज्यात श्रेयवादाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. बाबरी आम्हीच पाडली. तुम्ही तर भोंग्यालाही घाबरता, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) केली होती.
आपण बाबरी पाडली तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. पण शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक तिथे उपस्थित नव्हता, असा दावाही फडणवीसांनी केला होता. यानंतर फडणवीस हे मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडे मारत होते का? असा पलटवार शिवसेनेने सामनातून केला होता.
बाबरी मशिद कोणी पाडली यावरून श्रेयवाद सुरू असताना औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फडणवीसांचा एक जूना फोटो शेअर करत टीका केली आहे. लाठी चार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेला होता, असा घणाघात दानवे यांनी केला आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस पळताना दिसत आहेत. हा फोटो नेमका कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, फडणवीस भाजप कार्यकर्ते म्हणून काम करत असतानाचा हा फोटो असल्याचं म्हटलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचे तर मानसिकता महत्वाची – प्रविण पाटील
“निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”
“फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडा मारत होते?”
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
Comments are closed.