“राहुल गांधींना महाराष्ट्रात येऊ न देणाऱ्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही”

मुंबई | राहुल गांधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण, राहुल गांधी वीर सावरकरांची माफी मागवी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, अशा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता यावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात कोणी कोणाला येऊ देणार नाही, अशा गोष्टी करू नये, असं दानवे म्हणालेत.

राहुल गांधी काश्मीर-श्रीनगरला जाऊन आले. मग, महाराष्ट्र काय काश्मीर-श्रीनगर आणि पाकिस्तानात नाही. महाराष्ट्रात कोणीही येऊ शकते. त्यामुळे भाजपाने याला येऊ देणार नाही, त्याला देणार नाही, अशी भाषा करू नये, असं त्यांनी म्हटलंय.

जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही, अशा शब्दांत अंबादास दानवेंनी बावनकुळेंना सुनावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-