महाराष्ट्र मुंबई

वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

अंबरनाथ | वडापावमध्ये पालीचं मेलेलं पिल्लू आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंबरनाथच्या स्टेशन परिसरातील बबन वडापाव या प्रसिद्ध दुकानात हा प्रकार घडला आहे. 

अल्पा गोहिल नावाच्या तरुणीने या दुकानातून नास्त्यासाठी वडापाव नेला होता. या वडापावमध्ये पालीलं मेलेलं पिल्लू आढळल्यानं तिला धक्का बसला. दुकानदाराला जाब विचारल्यामुळे तिला हाकलून लावण्यात आलं. 

दरम्यान, ग्राहकांनी गोंधळ घातला. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संबंधित दुकानाचं फूड लायसन्स संपल्याचं लक्षात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत हे दुकान बंद केलं आहे. तसेच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पोरींनी देशाचं नाव काढलं; मारली अंतिम फेरीत धडक…

-अटलजींच्या अस्थीकलश दर्शनावेळी भाजप मंत्र्यांचा हास्यविनोद, व्हीडिओ व्हायरल

-चाहत्याच्या आवाहनामुळे केरळवासियांना 1,00,00,000 एवढ्या रूपयांची मदत, कोण आहे हा अभिनेता?

-‘मुंगळा’ नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला, हेलनला टक्कर देणार ‘ही’ अभिनेत्री

-रिलायन्सनं दाखवलं औदार्य; केरळवासियांना केली मोठी मदत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या