बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणासाठी वंचितचा एल्गार! मराठा मोर्चात स्वत: प्रकाश आंबेडकर उतरणार

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी उद्या महाराष्ट्रात मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.  या मोर्चाला आता वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंंबा दर्शवला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर स्वत: या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी उद्या प्रकाश आंबेडकर कोल्हापूरात दाखल होतील.  काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंंबेडकर यांनी संभाजीराजेंची भेट घेतली होती. यानंतर आता उद्या मोर्चात सहभागी होऊन मराठा आंदोलनाला ते आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन याविषयी माहीती देण्यात आली आहे.

उद्या  16 जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या अधिकृृत ट्वीटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.

दरम्यान,  मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोन्ही राजे देखील एकत्र आले आहेत. कालच या मुद्द्यावरुन  संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली होती.

थोडक्यात बातम्या – 

कंगना रणौतला दिलासा नाहीच, हायकोर्टानं पुन्हा फटकारलं

अनोखं संशोधन! आसपास कोरोना रुग्ण असेल तर 15 मिनिटांत वाजणार अलार्म

मनसुख हिरेन प्रकरणातील स्फोटकांनी भरलेल्या कारचं लातूर कनेक्शन उघड

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार चाहत्यांच्या भेटीला

‘तू तर अंतर्वस्त्र घालायची विसरली’, बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री होतेय ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More