Ambernath Murder | अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सीमाने राहुलला उसने पैसे दिले होते. मात्र, तिच्याकडून पैसे परत करण्यासाठी तगादा लावला जात होता. “उसने दिलेले पैसे परत दे नाहीतर माझ्याशी लग्न कर” असा तगादा लावत असल्याच्या वादातून त्याने सीमाची भरदिवसा रेल्वे स्थानकावर हत्या केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. (Ambernath Murder)
राहुल आणि सीमा यांच्यात प्रेमसंबंध होते, गेल्या सहा वर्षांपासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या १३ वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशी धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे. सीमा राहुलशी लग्न करणार असल्याची कुणकुण लागल्याने सीमा आणि राहुलची आई या दोघींमध्ये नेहमीच वाद होत होते. “राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल” अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती.
प्रियकराने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत केली हत्या
अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेवर तिच्या परिसरात राहणाऱ्याच प्रियकराने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असून ती ३५ वर्षांची होती. ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर, सीमाचे प्रेमसंबंध राहुल अरुण भिंगारकर या २९ वर्षाच्या तरुणाशी जुळले. सहा वर्षांपासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या १३ वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशीही धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे. राहुल हा कर्जबाजारी होता, कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता. तर, सीमाचेही राहुलवर प्रेम असल्याने सीमाने जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते. (Ambernath Murder)
उधारीचे पैसे परत मागीतल्याने वाद
सीमाला राहुलने लग्नाचे आमिष दाखवले होते, त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते. राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला देखील माहिती होते. मात्र, सीमा राहुलशी लग्न करणार असल्याची कुणकुण लागल्याने सीमा आणि राहुलची आई या दोघींमध्ये नेहमीच वाद होत होते. “राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल” अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती. त्यानंतर, राहुल लग्न करणार नसल्यामुळे “माझे दिलेले पैसे परत दे” असा तगादा सीमाने लावला. सीमाच्या बहिणीने “तो लग्न करत नसेल तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे” असा सल्ला तिला दिला होता.
Title : Ambernath Murder woman murder by boyfriend over money dispute