बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रवीण गायकवाड यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे | विधान परिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्याक्ष प्रवीण गायकवाड यांनी संधी द्यावी म्हणून राज्यभरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी राज्यात 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांना आमदार करा अशी मागणी करताना दिसत आहेत.

प्रवीण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. प्रवीण गायकवाड यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचं लोकसभा निवडणूकीवेळी बोललं जात होतं. मात्र काँग्रेस नेते मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा माणूस खोटं बोलायला लागला- विनोद तावडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले ‘हे’ मोठे आर्थिक निर्णय

मे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More