हैदराबाद | स्मशानातील गैरसमज आणि अंधश्रद्धा, त्यातच स्मशानाच्या नूतनीकरणाचं काम करण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे आमदार निम्माला रामा नायडू यांनी चक्क एक रात्र स्मशानात घालवली.
एका कामगाराने स्मशानात अर्धवट जळलेला मृतदेह पाहिल्यानं त्यांच्यात भीती पसरली होती. त्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी नायडू यांनी अंथरुण-पांघरुण घेऊन थेट स्मशानाची वाट धरली.
अजून दोन-तीन दिवस मी स्मशनातच झोपणार असून कामगारांच्या मनातील धाकधूक कमी होईल आणि ते जोमाने काम करू शकतील, असं निम्माला रामा नायडू म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!
-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी
-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!
-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???
-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल