Hrithik Roshan सोबत पुन्हा रोमांन्स करणार अमिषा पटेल?; स्वत:च केला मोठा खुलासा

Ameesha Patel | 2000 साली आलेला ‘कहो ना प्यार है’ चित्रपट प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यामधील दोघांची जोडी तेव्हा खूपच फेमस झाली होती.  यासोबत चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. आता ही जोडी तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः अभिनेत्री अमिषा पटेल हिनेच मोठा खुलासा केलाय. 

बऱ्याच वर्षांनंतर या रोमँटिक चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अमिषा पटेल (Ameesha Patel) हिने मोठी माहिती दिली.  ‘कहो ना प्यार है’ मधील सोनिया सक्सेना या भूमिकेमुळे आमिषाला प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटानंतर अमिषाने ‘गदर एक प्रेम कथा’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ आणि ‘मंगल पांडे’ यासारख्या चित्रपटात काम केलं.

‘कहो ना प्यार है’ चा सिक्वेल येणार?

मात्र अमिषाला (Ameesha Patel) प्रसिद्धी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानेच मिळवून दिली. अशातच अमिषाने आपल्या डेब्यू चित्रपटाबद्दल खुलासा केलाय.  काही दिवसांपूर्वीच अमिषाने इंस्टाग्राम फॉलोवर्स वाढवण्यासाठी ‘आस्क मी समथिंग’ हे सेशन ठेवलं होतं. या दरम्यान तिने चित्रपटाच्या सिक्वेल बाबत माहिती दिली.

एका युझरने अमिषा पटेल हिला ‘कहो ना प्यार है’ चा सिक्वेल येणार का?, असा प्रश्न केला. यावर अभिनेत्रीनेही रंजक उत्तर दिलं. या उत्तराची आता सोशल मीडियावर एकच चर्चा होते आहे. अमिषा म्हणाली की, ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट तेव्हा तयार होईल जेव्हा 60 करोड पेक्षा अधिक ओपनिंग त्याला मिळेल. चित्रपट येईल तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल. याच्या पहिल्या पार्टनेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. जर याचा सिक्वेल आला तर हा चित्रपट देखील बक्कळ कमाई करेल.  असा विश्वास देखील यावेळी अमिषाने व्यक्त केला.

अमिषा पटेल आणि ऋतिक रोशन दिसणार एकत्र?

दरम्यान ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल (Ameesha Patel)यांचा ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सर्वाधिक पुरस्कार मिळवण्यात या चित्रपटाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव कोरलं आहे. तसंच   अभिनेता ऋतिक रोशनला बेस्ट डेब्यू एक्टर हा पुरस्कार मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत जोरदार चर्चा होते आहे. अमिषाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच ‘गदर 2’ मध्ये दिसून आली आहे. तब्बल 22 वर्षांनी तारा सिंह आणि सकीना यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसून आली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.

News Title :  Ameesha Patel and Hrithik Roshan to be seen together

महत्वाच्या बातम्या- 

अबू सालेमसोबत कंगनाची पार्टी?; ‘त्या’ व्हायरल फोटोवर अभिनेत्रीनं दिलं स्पष्टीकरण

“ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके…”, सुप्रिया सुळेंची सरकारकडे थेट मागणी

“गाडीवरून पाय पुरतात का तुमचे?”; ऊंचीवरून डवचणाऱ्या नेटकऱ्याला दत्तू मोरेचं रंजक प्रत्युत्तर

RBI कडून ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांच्या पार; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट