नवी दिल्ली | सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमध्ये सीएए कायद्याला समर्थक करणारे आणि विरोध करणारे या दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे काल हिंसाचाराचा उसळला आहे.
दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी एकमेकांना भिडले. या हिंसाचारामध्ये दिल्लीतील एका पोलिसासह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकजण यामध्ये गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहने, आसपासच्या घरांना तसेच, गोदाम-दुकाने यांनाही आग लावण्यात आली.
दरम्यान, भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत पोहोचण्याच्या अगोदर हिंसाचार भडकला. त्यामुळे हिंसाचार जाणीवपूर्वक भडकवल्याचा दावा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आला.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मनसेबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….
मालिकेतील कोणताच भाग वगळणार नाही; अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा- संजय राऊत
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केल्यावर धनंजय मुंडे म्हणाले…
माळेगाव निवडणुकीच्या 7 जागांचा निकाल जाहीर
Comments are closed.