वॉशिंग्टन | अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांचा समान दर्जा देणारं विधेयक मंजूर केलं आहे. त्यामुळे आता संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्यवहार करताना अमेरिका आपले नाटोचे सहकारी देश इस्त्राइल आणि दक्षिण कोरिया यांच्याप्रमाणेच भारतासोबतही व्यवहार करेल.
आर्थिक वर्ष 2020 साठी नॅशनल ‘डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट’ला अमेरिकेच्या सिनेटने मंजुरी दिली आहे. तसेच या विधेयकातील संशोधनाच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे.
भारताबरोबर परस्पर सहकार्य, दहशतवादाविरोधात लढा, कांऊटर पायरसी आणि समुद्री सुरक्षेवर काम करण्याची आवश्यकता असल्याचं अमेरिकेच्या सिनेटनं सांगितलं.
दरम्यान, नाटो देशाचा दर्जा मिळाल्यामुळे अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री भारत खरेदी करु शकणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी धोक्यात?
-हे पहायला पुन्हा यायचंय का?; राष्ट्रवादी युवकचा मुख्यमंत्र्यांना सवाल
….म्हणून इलाहबादच्या न्यायाधीशांनी मोदींना लिहिलं पत्र
-माझ्या वयावरून बोललात तर याद राखा; सुरेखा पुणेकर
-“खासदारांना घेऊन देवदर्शन करत फिरण्याऐवजी शिवसेना प्रमुखांनी नालेसफाई करायला हवी होती”
Comments are closed.