बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेचा चीनला सर्वांत मोठा दणका; ट्रम्प यांची मोठी खेळी

नवी दिल्ली |  चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने सगळ्या जगाला वेठीस धरलेलं असताना आता अमेरिकेने चीनला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने शेअर मार्केटमधून चीनच्या काही कंपन्यांना काढून टाकण्याची तयारी केली आहे.

अमेरिकेने संसदेने डिलिस्टींग विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. यामुळे अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड आणि बैदू इंकसारख्या चीनी कंपन्यांना आता अमेरिकन शेअर बाजारात निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. कोरोना रूग्णांची सातत्याने होणारी वाढ आणि मृत्यूंचं वाढलेलं प्रमाण हा अमेरिकेसाठी अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे अमेरिकेने तडकाफडकी डिलिस्टींग विधेयकाला मंजुरी दिलेली आहे.

विशेष म्हणजे रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी डिलिस्टींग विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर होणार आहे. आणि त्यानंतर अमेरिका चीनची आर्थिक कोंडी करेल.

ट्रेंडिंग बातम्या-

डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

महत्वाच्या बातम्या-

आरबीआयची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद, या दोन मोठ्या घोषणा होणार?

“ज्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिलंय ते आंदोलन करतायेत, मेरा आंगण मेरा रणांगण”

राज्यपालांच्या अंगणात लोळण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा करा- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More