आरोग्य कोरोना विदेश

कोरोना लसीच्या शोधात अमेरिका आघाडीवर; केलंय हे अचाट काम

अमेरिका | कोरोनाला मात देण्यासाठी जगभरात संशोधनकार्य सुरू आहे. मात्र या प्रयत्नात अमेरिका आघाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेत तब्बल 4 लसींना मान्यता दिली असून लवकरच यासाठी मानवी चाचण्याही घेतल्या जाणार आहेत.

या लसीच्या मानवी चाचणीसाठी आता 4 उमेद्वारांची निवड करण्यात आल्याची माहिती, अन्न व औषध विभागाचे प्रमुख स्टीफन यांच्याकडून देण्यात आली आहे. यासोबत अमेरिकेत अजून 6लसींवर संशोधनकार्य सुरू आहे.

लसीची मानवी चाचणी करण्यात येणार असली तरी, अमेरिकेला लस बनवण्यात यश येईल याची खात्री देता येणार नाही, असं संसर्गजन्य रोगतज्ञ ए.फाॅसी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं पहायला मिळत आहे.

अमेरिकेतील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असताना आता लवकरात लवकर लस बनविणं गरजेचं आहे. अमेरिकेच्या या लसीच्या मानवी चाचणीस यश आल्यास, वर्षाच्या अखेरीस लस कोरोना बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध होईल असं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

‘देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय’, ‘डॉक्टर्स डे’निमित्त राजेश टोपेंचं डॉक्टरांना पत्र

‘लालबागचा राजा’चा ऐतिहासिक निर्णय’; यंदा गणेशोत्सव नव्हे तर….

काय बोलावं आता… संत निवृत्तीनाथ पालखीचं एसटीने ‘इतक्या’ हजारांचं फाडलं तिकीट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या