बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

वॉशिंग्टन | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. या परिस्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे प्रमुख आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथॉनी फाऊची यांनी भाष्य केलं आहे.

भारतात काही दिवस लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊन केल्यास या कठीण काळात अत्यावश्यक पावलं उचलण्यास वेळ मिळेल, असं डॉ. अँथॉनी फाऊची यांनी म्हटलं. ते एका मुलाखतीत बोलत होते.

भारतानं लसीकणावर भर द्यायला हवा. भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ती सुधारण्यासाठी तत्काळ काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत डॉ. अँथॉनी फाऊची यांनी व्यक्त केलं आहे. भारतात 6 महिने लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची संक्रमणाची साखळी खंडित करता येईल. या कालावधीचा वापर कोरोना संकटाचा सामना करण्याच्या तयारीसाठी करता येईल, असं फाऊची यांनी सांगितलं.

ऑक्सिजन, औषधांच्या पुरवठ्यासाठी एका आपत्कालीन गटाची स्थापना गरजेची. हा गट याबद्दल नियोजन करेल. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मदत घेता येईल. तसेच सरकारनं विविध गटांना सोबत आणायला हवं. युद्ध काळात उभारली जातात, तशी फिल्ड रुग्णालयं उभारायला हवीत, असे सल्ले फाऊची यांनी भारताला दिले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

चंद्रपूर हळहळला! अवघ्या 35 वर्षीय डाॅक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, तरुणानं शेअर केला धक्कादायक अनुभव

प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन!

कोरोनाने उद्धवस्त केला नवदाम्पत्याचा संसार; अवघ्या तीन दिवसात नवरदेवाला कोरोनाने गाठलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More