नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून विस्तृत्व चर्चा झाली. अमेरिका आणि भारतात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुर्ववत करण्यासंबंधी ट्रम्प-मोदी यांच्यात चर्चा झाली. (American President Donald trump And Indian pm narendra Modi Telephone Conversation)
भारत अमेरिका मिळून कोरोनाविरोधातली लढाई लढू, असं अमेरिकेचे राष्टाराध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारत आणि अमेरिकेच्या ताकदीचा उपयोग या लढाईत करू, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. (American President Donald trump And Indian pm narendra Modi Telephone Conversation)
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत माझी फोनवरून विस्तृत चर्चा झाली, असं मोदींनी ट्विट करून सांगितलं आहे. आमची चर्चा अतिशय उत्तम झाली. कोरोनाला हरवण्यासाठी भारत आणि अमेरिका पूर्ण ताकदीने मैदानात आहे, असा विश्वास आम्ही एकमेकांना दिल्याचं मोदींनी सांगितलं आहे. (American President Donald trump And Indian pm narendra Modi Telephone Conversation)
दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रसार खूपच झटपटरित्या व्हायला लागला आहे. अगदी काहीच दिवसांत हा आकडा तीन हजार पार गेला आहे तर मृतांची संख्या देखील वाढते आहे. दुसरीकडे अमेरिकेला तर कोरोनाने पछाडलं आहे. दिवसेदिवस अमेरिकेची स्थिती बिकट होत चालली आहे. प्रतिदिवशी जवळपास सहाशे ते सातशे लोक मृत्यूमुखी पडत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांनी केलं कौतुक
परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती
महत्वाच्या बातम्या-
घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी…; पोलिस बाप-लेकीचा हृदयस्पर्शी फोटो होतोय व्हायरल!
लॉकडाऊन संपेपर्यंत ‘या’ भाजप आमदाराचा अन्नत्याग; कोरोनाच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत
अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह
Comments are closed.