Top News देश

… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

नवी दिल्ली |  भारतासह अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, ब्रिटन या आणि इतर बऱ्याच देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाऱ्यासारखा वेग धारण करत आहेत तर मृतांची संख्याही वाढते आहे. अमेरिकेत तर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेला सध्या भारताची गरज आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती केली आहे. जर गोळ्या पुरवल्या नाहीत तर याचे भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे.

रविवारी माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे. अमेरिकेला सध्या भारताच्या मदतीची गरज आहे.  भारताने जर अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवल्या तर आम्ही नेहमीच आभारी राहिन. मात्र जर नाही पुरवल्या तर त्यांची मर्जी. मात्र त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा देत आणि का भोगावे लागू नयेत?, असा उलट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

भारतात बऱ्यापैकी औषध उत्पादन केलं जातं. त्यापैकी भारतात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळीचं प्रॉडक्शन घेतलं जातं. सध्या कोरोनाने उद्भवलेली स्थिती पाहता भारत या गोळीचं वितरण किंवा अमेरिकेची गोळ्या पुरवण्याची विनंती मान्य करेल, याची शक्यता कमी आहे. हाच अंदाज घेऊन ट्रम्प यांनी भारताला थेट इशाराच दिला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीने निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत भारत-अमेरिकेच्या भागीदारीची संपूर्ण ताकद वापरण्याचे वचन दिले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन

‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

महत्वाच्या बातम्या-

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

इंग्लंडचे पंतप्रधान बोरेस जॉन्सन यांना ICU मध्ये हलवलं; 27 मार्चला कोरोना रिपोर्ट आला होता पॉझिटीव्ह

लॉकडाउन म्हणजे नोटाबंदीपेक्षा मोठी चूक- कमल हसन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या