बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील पेट्रोल-डिझेल आता अमेरिका स्वस्त करणार?; काय आहे नवा प्लॅन?

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी भारतात सर्वोच्च उच्चांक गाठला असताना इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत होती. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी व्हावे यासाठी दिवाळीच्या पुर्वसंध्येला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किंमतींचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होत असतो. त्यातच अमेरिकेने आता या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केल्याचं पाहायला मिळत आहे. बायडन सरकार युएस स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच SPR लागू कऱण्याच्या तयारीत आहे.

एसपीआर हे एक पेट्रोलियम रिझर्व्ह धोरण आहे ज्याची निर्मिती 1975 साली करण्यात आली होती. आणिबाणी व युद्धजन्य परिस्थितीत इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहाव्या यासाठी त्याची निर्मीती मुख्यत: करण्यात आली होती. आखाती देशातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतीचा फटका थेट अमेरिकेतील अर्थव्यवस्थेला बसत आहे.

एसपीआर या धोरणांतर्गत कच्च्या तेलाचं उत्पादन हे मागणीपेक्षा वाढवलं जातं. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शिवाय याचा थेट फायदा भारतासह कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून असलेल्या देशांना होणार आहे. जर हे धोरण लागू झालं तर भारतातील इंधनाचे दर काही प्रमाणात कमी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडणाऱ्या उमेदवाराला शिवसेना देणार मोठं गिफ्ट?

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला रिमेक

“पण हे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More