Amethi Loksabha Election | भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. तसेच मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगणा राणौतने विजय मिळवला आहे. कंगना तिच्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत होती. तिने आपल्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून जोरदार प्रचार केला आणि मंडीकरांनी मतदानाचा कंगनाला कौल दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हेमा मालिनी देखील आघाडीवर पाहायला मिळत होत्या. त्यानंतर आता स्मृति इराणी यांना पराभव स्विकारावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. (Amethi Loksabha Election)
स्मृति इऱाणींचा पराभव
उत्तर प्रदेशमध्ये 80 जागांवर मतदान पार पडलं होतं. दिवसभर मतदारसंघांची मतमोजणी सुरू होती. यामुळे उत्तरप्रदेश हे राज्य देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी निर्णायक ठरू शकतं. तसेच अमेठीतून भाजपच्या सीटवर स्मृती इराणी उभ्या होत्या. मात्र त्याचा पराभव हा काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांनी पराभूत केलं होतं. मात्र याचा वचपा आता काँग्रेसच्या उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी काढला आहे. (Amethi Loksabha Election)
Smriti Irani trailing from Amethi. pic.twitter.com/Z3yIBRh5jR
— Nimo Tai (@Cryptic_Miind) June 4, 2024
दरम्यान, स्मृति इराणी यांचा अमेठीतून (Amethi Loksabha Election) पराभव झाला असून यावर आता काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर स्मृती इराणी यांच्या पराभवावर मीम्स बनवले आहेत. त्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. (Amethi Loksabha Election)
Smriti Irani’s situation in Amethi be like :- pic.twitter.com/P0bqUpfh60
— खुरपेंच (@khurpenchh) June 4, 2024
अमेठीत गांधी घराण्याचं वर्चस्व
अमेठी येथे अनेक वर्षे गांधी घराण्याचं वर्चस्व आहे. संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी याच ठिकाणी खासदार म्हणून काम केलं आहे. 2019 मध्ये राहुल गांधीवर स्मृति इराणी यांनी विजय मिळवला. तर आता 2024 मध्ये स्मृती इराणी यांचा पराभव झाला.
News Title – Amethi Loksabha Election In Smruti Irani Lose Against Kishori Laal Sharma
महत्त्वाच्या बातम्या
ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?, जाणून घ्या सगळ्यांचा निकाल
सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी
मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय
रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं
महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!